About

My photo
𝗛𝗶, 𝗜'𝗺 𝗔𝗻𝗶𝗸𝗲𝘁 𝗞𝗮𝗺𝗯𝗹𝗲. 𝗜 𝘀𝘁𝗮𝗿𝘁𝗲𝗱 𝘁𝗵𝗶𝘀 blog 𝘁𝗼 𝗰𝗿𝗲𝗮𝘁𝗲 𝗮𝘄𝗮𝗿𝗲𝗻𝗲𝘀𝘀 𝗼𝗻 𝗰𝗼𝗺𝗺𝗼𝗻 𝗶𝘀𝘀𝘂𝗲𝘀 𝗼𝗳 𝗢𝘂𝗿 𝗟𝗶𝗳𝗲. 𝗜 𝗵𝗮𝘃𝗲 𝗯𝗲𝗲𝗻 𝘁𝗿𝘆𝗶𝗻𝗴 𝘁𝗼 𝗲𝗺𝗽𝗼𝘄𝗲𝗿 𝗮𝗻𝗱 𝗵𝗲𝗹𝗽 𝘁𝗵𝗲 𝗹𝗲𝘀𝘀 𝗽𝗿𝗶𝘃𝗶𝗹𝗲𝗴𝗲𝗱 𝗣𝗲𝗼𝗽𝗹𝗲. 𝙁𝙤𝙡𝙡𝙤𝙬 𝙩𝙝𝙞𝙨 𝙘𝙝𝙖𝙣𝙣𝙚𝙡 𝙛𝙤𝙧 𝙢𝙤𝙧𝙚 𝙧𝙚𝙜𝙪𝙡𝙖𝙧 𝙫𝙞𝙙𝙚𝙤𝙨 𝙪𝙥𝙙𝙖𝙩𝙚.🔔 𝗙𝗮𝗰𝗲𝗯𝗼𝗼𝗸➡ 𝗵𝘁𝘁𝗽𝘀://𝘄𝘄𝘄.𝗳𝗮𝗰𝗲𝗯𝗼𝗼𝗸.𝗰𝗼𝗺/𝗮𝗻𝗶𝗸𝗲𝘁𝗸𝗮𝗺𝗯𝗹𝗲𝗵𝗴𝘁 𝗧𝘄𝗶𝘁𝘁𝗲𝗿➡ 𝗵𝘁𝘁𝗽://𝘄𝘄𝘄.𝘁𝘄𝗶𝘁𝘁𝗲𝗿.𝗰𝗼𝗺/𝗮𝗻𝗶𝗸𝗲𝘁𝗸𝗮𝗺𝗯𝗹𝗲𝗵𝗴𝘁 𝗜𝗻𝘀𝘁𝗮𝗴𝗿𝗮𝗺➡ 𝗵𝘁𝘁𝗽://𝘄𝘄𝘄.𝗶𝗻𝘀𝘁𝗮𝗴𝗿𝗮𝗺.𝗰𝗼𝗺/𝗮𝗻𝗶𝗸𝗲𝘁𝗸𝗮𝗺𝗯𝗹𝗲𝗵𝗴𝘁 𝗪𝗲𝗯𝘀𝗶𝘁𝗲➡ 𝗵𝘁𝘁𝗽𝘀://𝘄𝘄𝘄.𝗮𝗻𝗶𝗸𝗲𝘁𝗸𝗮𝗺𝗯𝗹𝗲𝗵𝗴𝘁.𝗯𝗹𝗼𝗴𝘀𝗽𝗼𝘁.𝗶𝗻.

Wednesday 22 August 2018

बुद्ध शोधूया !! - अनिकेत कांबळे

आज बुद्धाचे छायाचित्र काढतांना मनात अनेक विचार आले . माणुस कोणीही असो मदतीला धावणारा बुद्ध आहे . शिल आचरणात आणून त्याची शिकवण देणारा बुद्ध आहे . न्याय , स्वातंत्र्य , समता बंधुत्वातून लोक जागृती करणारा बुद्ध आहे . बुध्दाच्या मार्गी जाणार्‍या बुद्ध आहे हया वरच तथागत बुद्धाचे छायाचित्र काढण्याच्या प्रयत्न केला . चित्राच्याव्दारे शोधक्रिया सांगितली . चला तर मग माणसा माणसात बुद्ध शोधूया . धर्मा धर्मात बुद्ध शोधूया . जाती पातीत बुद्ध शोधूया . काया मातीत बुद्ध शोधूया . रंगा रंगात बुद्ध शोधूया . वर्ण , कर्म , मर्मात बुद्ध शोधूया . तन , मनात बुद्ध शोधूया . होय , मना मनात बुद्ध शोधूया . मी बुद्ध तु बुद्ध आपण सारेच बुद्ध . आता युद्ध नकोच , तर बुद्धाचाच मार्गाने पानथस्त होऊया !

Wednesday 11 July 2018

जॉर्ज कार्व्हर च साहित्य दर्शन by अनिकेत कांबळे

अमेरिकेतल्या दलित लोकांच्या जीवनाचं मनाला चटका लावणारं चित्रण व त्या वातावरणात स्वतःची जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळविलेल्या जॉर्ज कार्व्हर या महान वैज्ञानिकाची अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी, उत्तमरीतीने मांडलेली कथा

Friday 6 April 2018

'नापास मुलांची गोष्ट ' पुस्तक परिक्षण - अनिकेत कांबळे

प्रथम वर्ष बी.ए अभ्यासक्रमाच्या निमित्ताने 'नापास मुलांची गोष्ट' हे पुस्तक वाचनात आले . अत्यंत उत्कृष्ट आणि प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे. ऋतुरंग प्रकाशनाच्या या पुस्तकाचे संपादन अरुण शेवते यांनी केले आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हा सुविचार आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि अगदी आजही मनाला उभारी देण्यासाठी आपण रोजच्या जीवनात तो मनात घोळवत असतो. हेच सुवचन काही थोर व्यक्तींच्या जीवनात कसं खरं ठरलं आणि ते आज आपले आदर्श कसे ठरले याचा थोडक्यात आढावा या पुस्तकात आहे.. आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकजण संघर्ष करत आहे.त्यात काही यशस्वी होतात तर काही अपयशी.मग हे अपयशी निराशेच्या गर्ततेत अडकून जातात.हताश होऊन प्रयत्न करणं सोडून देतात.स्वप्न सोडून देतात.मार्ग भरकटतात.काही तर जगणंही सोडून देतात. दहावी बारावीच्या निकालानंतर आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच्या बातम्या आपल्या कानावर ये असतात.अशावेळी श्री.अरुण शेवते यांचे हे संपादीत पुस्तक वाचले तर नक्कीच विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल की अपयशाने खचून न जाता जर नव्या उमेदीने प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळते. या पुस्तकात मोठे मोठे आदर्श दिगग्ज शाळेच्या परीक्षेत नापास झाले तरी त्यांनी जीवनाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे याचे वर्णन आहे.अर्थात यामागे त्यांची मेहनत, चिकाटी, कलागुण आणि हार न मानण्याची वृत्ती दिसून येते. राष्ट्रपिता महात्मा गांधी, आइन्स्टाइन, जे.कृष्णमूर्ती, विस्टन चर्चिल, लोकमान्य टिळक, अगस्त्यु रोद, रामानुजन, इंदिरा गांधी, राजकपूर, यशवंतराव चव्हाण, कुसुमाग्रज, दया पवार, ना. सी.फडके, आर.के.नारायण, सी रामचंद्र,शांता शेळके, आर.के.लक्ष्मण, गुलजार, सुशीलकुमार शिंदे, चंद्रशेखर धर्माधिकारी, जयंत साळगावकर, नरेंद्र जाधव, यशवंतराव गडाख, लक्ष्मण माने, वाय.सी.पवार या साऱ्या महान लोकांनी अपयशाचे दुःख चाखले आहे. पण त्याने तोंड कडू न करता प्रयत्नपूर्वक यशाच्या गोड फळांचा मागोवा घेतला आहे.आणि आपल्या क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला आहे. उदाहरणार्थ ग.दि.माडगूळकरांना आपण पदवीधर नाही याचं दुःख वाटायचं पण आज कित्येक पदवीधर त्यांच्या साहित्याचा अभ्यास करत आहेत. कोणत्याही पदवीधरापेक्षा अफाट प्रतिभा, बुद्धी व भाषाप्रभुत्वाचा ठेवा त्यांच्या जवळ होता. या पुस्तकाची भाषा भावपर असून त्यात कृत्रिमता जाणवत नाही.समजण्यास अत्यांत सोपी आहे.तसेच प्रत्येक लेखाच्या टिपणीत तो लेख कोठून मिळवला याचा उल्लेख आहे.त्यामुळे संदर्भ समजण्यास मदत होते. मुखपृष्ठावर पुस्तकाचे शीर्षक व आदर्श व्यक्तींची छायाचित्रे आहेत. मलपृष्ठावरही छायाचित्रे व पुस्तकाचा सारांश आहे.शेवटच्या चार पृष्ठांवर नापास मुलांचे प्रगतीपुस्तक आहे.त्यामुळे संपूर्ण पुस्तकाचा तपशील पुन्हा एकदा नजरेसमोर उभा राहतो. त्यामुळे वाचकांच्या मनात येणाऱ्या अपयशाने खचून न जाता आपल्या कलागुणांसह पुन्हा नव्याने सुरवात करण्याची सकारात्मक प्रेरणा निर्माण होते. ध्येयाने प्रेरित असणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक एकदातरी नक्की वाचावे. पुस्तक परीक्षण: अनिकेत कांबळे पुस्तकप्रेमी

बुद्ध शोधूया !! - अनिकेत कांबळे

आज बुद्धाचे छायाचित्र काढतांना मनात अनेक विचार आले . माणुस कोणीही असो मदतीला धावणारा बुद्ध आहे . शिल आचरणात आणून त्याची शिकवण देणारा बुद्ध ...